बुधवार, ३ ऑगस्ट, २०१६

माझी फेसबुकवर येणारी पोस्ट उशिरान येते ; प्रसंग घडून कित्येक दिवस झाल्यावर . छोटी पोस्ट असेल तर तात्काळ टाकता येते . लिहायला लागणारा वेळ , होणारी धावपळ , प्रवास , टायपींगच्या साधनाचा अभाव इ . कारणांमुळे 15 दिवस , एक महिना किंवा 2 महिन्यांनी माझा विषय मांडला जातो ! खूपदा घटना विसरुनही जातो मी . अशा कित्येक बाबी मी अजूनही लिहायच्याच आहेत . मी म्हणतोय लिहायचं ; पण तशी वेळ येत नाहि ! कित्येक गोष्टि राहूनच गेल्या ! असो !
‌ 19 मेच्या आसपास मला लक्ष्मी शामल सुभाष हिचा फोन आला . फोनवर तिनं एका मनोरुग्ण महिलेबद्दल मला सांगितलं . कित्येकदा तिला त्या मणोरुग्ण ताईच्या उपचार आणि पुनर्वसन याबद्दल काहीतरी करावसं वाटलं ; पण ती धीर एकवटू शकली नव्हती . मणोरुग्णांबद्दल अनेक तर्क आपण लावून ठेवलेले असतात . त्यातल्या काही तर्कांवर ती स्वतःला तिच्या जवळ जाण्यापासून नाईलाजाने थांबवत होती . लक्ष्मी तसं बोललीही मला . तिनं मला त्या मनोरुग्ण महिलेबद्दल अतिशय विदारक माहिती पुरवली . ती महिला बहुतेकदा नग्नावस्थेत असते , एका जागी बसून असते . लक्ष्मीला मनोरूग्ण लोकांच्या भावावस्थेबद्दल समजावून सांगितले . बिनधास्त जवळ जाऊन बोलायला सांगितलं . लक्ष्मीनं धाडस केलं , लक्ष्मी तिच्याशी मग 2 - 2 तास बोलत बसायची . आणि मग तिची घालमेल तिच्या बोलण्यातून माझ्याकडे व्यक्त व्हायची .
लक्ष्मीची ती मैत्रीण झाली होती . हिला घराकडं घेऊन जाण्यातल्या अडचणींमुळे लक्ष्मी चुकचूकत होती . तिथं उपचार कसा होणार मग ....! तिला लवकरात लवकर दाखल करता यावे यासाठी लक्ष्मीने इतर शासकिय मनोरुग्णालयांविषयी माहिती काढली होती ; पण शासकिय मणोरुग्णांलयांबद्दल आणि तिथल्या अनेक बाबींबद्दलची कल्पना मी दिली . त्या महिलेला लक्ष्मीने दिलेला ड्रेस सकाळी तिच्या अंगावर नसायचा. तीनं तो स्वतः काढून टाकलेला असावा कींवा तो कुणीतरी काढून घेतला असावा.... . ऐकून खूपच घालमेल झाली माझी . लक्ष्मीला ताबडतोब फोटो पाठवायला सांगून मी तिच्या पूनर्वसन आणि उपचारांविषयी श्रद्धा पूनर्वसन केन्द्रात ई-मेल केला . स्वतः डॉ. भरत वाटवाणी यांनी जातीनिशी लक्ष घालून रुग्णवाहिका वाशीमध्ये येण्यापासून ते ती मनोरुग्ण ताई गाडीत बसेपर्यंत मला त्यांनी मेसेज करून माहिती दिली .मला या माणसाचं खरंच कौतुक वाटतं ...हुरूप येतो आणखी काम करण्याचा !
या सर्व प्रकरणात लक्ष्मीने धाडस आणि चिकाटी दाखवल्यामुळे गेली दोन महिने ही मनोरूग्ण असलेली ताई उपचार घेत आहे ......